टेक्नॉलॉजीच्या कुरुदवाड दि. ८ (वार्ताहर) - कोंडिग्रे (ता शिरोळ) येथील श्रीवर्धन बायोटेक तसेच डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील सोशल फौंडे शन मार्फत जयसिंगपूरसह शिरोळ परिसरातील नागरिकांना मोफत कोबी भाजीपाला वाटप करण्यात आले. दरम्यान, संचार बंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक भाजीपाला आवश्यक होता, त्यामुळे जयसिंगपूर शिरोळ भागातील नागरिकांना कोबी वाटप करण्यात आला, श्रीवर्धन बायोटेक तसेच सा, रे. पाटील फाउंडेशन च्या वतीने नागरिकांना भाजीपाला उपलब्ध झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे, यावेळी दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील दादा यांच्यासह दत्तचे संचालक दरगू गावडे, मुसा डांगे, राजू पाटील, सातगोंड गौराज, वरूण पाटील, तौसिफ जमादार तसेच माजी आमदार डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर लॉक डाऊन परिस्थितीमळे कारखान्याचा गळीत हंगाम संपला असला तरी शासनाच्या आदेशानुसार ऊसतोड मजुरांना व त्यांच्या जनावरांना दत्त कारखान्यामार्फत सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूसह त्यांच्या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे , शासना तर्फे पुढील आदेश होईपर्यंत मजुरांना राहण्याची भोजनाची सोय केली जाणार आहे आज पर्यंत ३ हजार ऊस तोड मजुराना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
श्रीवर्धन बायोटेक व डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशनमार्फत नागरिकांना मोफत कोबी भाजीपाला वाटप