3.देशात कोरोनाचा नववा बळी, परदेशी प्रवास नाही, पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू

कोलकाता : देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा वर पोहोचला आहे. आज (२३ मार्च) पश्चिम बंगालमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात , कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पश्र्चिम बंगालमध्ये आज दुपारी ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोलकातामधील सॉल्टलेक या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेशनवर होते. मात्र दुर्दे वाने आज त्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या मृत रुग्णांची कुठल्याही प्रकारची ट्रव्हल हिस्ट्री नव्हती. हा रूग्ण १३ मार्च रोजी सर्दी, ताप आणि घसा खवखवत असल्याकारणाने रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर १६ मार्चला त्यांना वास घेण्यास अडचणी होत आहे. यानंतर १९ मार्चला त्यांचा कोरोनाची लागण झाल्याचे उघड झालं होतं.यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये एकाचा मृत्यू ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली आणि त्यांना व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं. मात्र आज हार्टअॅटकमुळे त्यांचा मृत्यू झाला.देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज (२३ मार्च) भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४१५ इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक ३९, पुणे १६, पिंपरी चिंचवड १२ रुपण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती . दिली.महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये ६७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत ३० आणि उत्तरप्रदेशात २५ कोरोनाग्रस्त पण पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू ? कर्नाटक - ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू () - ११ मार्च दिल्ली -६९ वर्षीय महिलेचा मृत्यू () - १३ मार्च मुंबई - ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू () - १७ मार्च पंजाब - एका रुग्णाचा मृत्यू () - १९ मार्च मुंबई - ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू () - २२ मार्च पाटणा - ३८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू () - २२ मार्च गुजरात - ६७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू () - २२ मार्च मुंबई - ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू () - २३ मार्च पश्चिम बंगाल - ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू () - २३ मार्च