हेरवाडकरांनी पाळला सोशल डिस्टंन्स

हेरवाडकरांनी कुरुदवाड दि. ८ (वार्ताहर) - कोरोनाचा पार्श्वभूमिवर हेरवाडमध्ये विविध उपाययोजना राबवित आहेत, याला ग्रामस्थांनी सहकार्य करत असून येथील धान्य वाटपाबरोबरच अत्यावश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी हेरवाडकरांनी सोशल डिस्टन्स पाळत प्रशासनाला सहकार्य केले असल्याचे दिसून येत आहे. __ सध्या देशात पसरलेल्या कोरोना सक्र मनाची चेन रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधात्मक दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दोन दिवसापूर्वी या समितीच्या वतीने गावील बेकायदेशीर विक्री करणारी दारु जप्त करुन त्याचे सॅनिटायझर बनविले होते. व हे सॅनिटायझर गावातील कारोनाच्या लढ्यासाठी ल ढ णान्यांना वाट ण्यात आले होते . लॉकडाऊन काळात सार्वजनिक ठिकाणी कोणीही बसू नये यासाठी समितीच्या वतीने नामी शक्कल लढविण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी जळके ऑईल टाकण्यात आल्याने सध्या गावात सार्वजनिक ठिकाणी बसणाऱ्यांची संख्या घटली असून ग्रामस्थांनी आता सोशल डिस्टंन्स पाळत प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी कोरोना प्रतिबंधक दक्षता समिती प्रयत्न करत आहे.