लातूर : सर्वत्र करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असताना लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कुणावर मात करण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महानगरपालिकेचे करोना नियंत्रण कक्ष कार्यान्वित, शहरातील संशयित रुग्णापर्यंत शहरातील संशयित रुग्ण सर्वात अधिक पोहोचते मनपाची आरोग्य यंत्रणा. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करोना नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला असून मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत माले, डॉक्टर सुहास गोरे व इतर वैद्यकीय अधिकारी २४ तास नियंत्रण कक्षाद्वारे कार्यरत आहेत. महानगरपालिकेचे सर्व आरोग्य केंद्र सकाळी १० ते ६ वाजे पर्यंत कार्यरत ठेवून शहरातील संशयित रुग्ण बाबत माहिती मिळताच तातडीने त्या रुग्णांना संपर्क करून खात्री करून घेण्यात येत आहे व त्यांच्या पुढील तपासण्या करून घेण्याकरिता या नियंत्रण कक्षाच्या वतीने पावले उचलली कोरोनाची चोरांनाही करीतजात आहेत. शहरी भागांमध्ये संशयित रुग्णापर्यंत लातूर शहर महानगर पालिकेची यंत्रणा पोहोचण्याचे सर्वात प्रथम दायित्व निभावत आहे. घरोघर जाऊन माहिती संकलन व जनजागृती. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने ७४ आशा सेविका ४० आरोग्य सेविका व ११४ अंगणवाडी मदतनीस यांचे पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली घरोघरी जाऊन नागरिकांना कोरडा खोकला तीव्र ताप असल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रापर्यंत पुढील उपचाराकरिता पोहोचवीत आहेत. तसेच पुणे मुंबई व इतर बाहेरगाव येथून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत आहे याच बरोबर करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता घ्यावयाच्या खबरदारी बाबत जनजागृती करीत आहेत. विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मदतीने तपासणी केंद्र कार्यान्वित. शहरातील विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मदतीने संस्थेच्या आवारातच करोना तपासणी व ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून लातूर शहर महानगरपालिकेने थर्मल स्कॅनर ही उपलब्ध करून दिलेली आहे. मनपा स्वच्छता कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना हॅण्ड वॉश चे वाटप. करोना विषाणूंची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असणाऱ्या मनपा स्वच्छता कर्मचारी व शहरांतर्गत कार्यरत पोलिस कर्मचारी यांना लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने लिक्विड हँडवॉश चे वाटप करण्यात आलेले असून त्यांनी वारंवार हात दुखत स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. बस स्थानक येथे बाहेरून येणाऱ्या रुग्णांची तपासणी. मागील काही दिवसापासून लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येथे बाहेरगावाहन येणाऱ्या रुग्णांची तपासणी नियमितपणे केली जात आहे याकरिता महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आलेली असून संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील तपासणीकरिता पाठविण्यात येत आहे. महापौर व उपमहापौर सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवून घेताहेत दैनंदिन आढावा. लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने केले जात असलेल्या उपाययोजनांवर महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार बारकाईने लक्ष ठेवून असून दैनंदिन आढावा घेत आहेत. तसेच जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, शासकीय वैद्यकीय संस्था व खाजगी वैद्यकीय तज्ञ यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सर्व तपासणी केंद्रास दैनंदिन वैयक्तिक भेटी देऊन सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करीत आहेत.
करोना वर मात करण्याकरिता लातूर शहर महानगरपालिका करीत आहे विविध उपाय योजना